हिंगणगाव -खामगाव टेक मुळा मुठानदीवर वाहतुकीसाठी मोठा पुल व्हावा अशी मागणी हिंगणगाव ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच,ग्रामसेवक व ग्रामस्थ, कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती.या कामी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्य मंत्री एकनाथराव शिंदे यांना भेटून 25 कोटी ची मागणी केली असता त्यांनी पी. एम. आरडी. चे आयुक्त यांना आदेश देऊन पुढील कामाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हिंगणगाव खामगाव टेक मुळा मुठा नदी वर १९ कोटी रुपये निधी मंजूर झाला कामाची निविदा प्रक्रिया निघाली असून पंचक्रोशीतील नागरिकांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. हिंगणगाव, खामगाव टेक, शिंदेवाडी, न्हावी, सांगवी,मिरवडी, टिळेकर वाडी, उरुळी कांचन, भवरापुर विविध गावचे सरपंच, ग्राम सेवक उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांची मुलाची अनेक दिवसांपासून ची मागणी होती.
हिंगणगाव, खामगाव टेक मुळामुठा नदीवरील पुलाचे ऑनलाईन टेंडर निघाले असून 22 फेब्रुवारी नंतर होणार वर्क ऑर्डर होणार आहे. विविध गावच्या ग्रामस्थांनच्या आंदोलनास यश प्राप्त झाले आहे.माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहे.
अंकुशराव कोतवाल
माजी सरपंच, हिंगणगाव