वाघोली, दि. ३ (प्रतिनिधी);
बकोरी देवराई वनराई प्रकल्पात छत्रपती जलाशयाचे काम प्रगतीपथावर असून एक कोटी लीटर पाणी साठवणुक क्षमतेचा तलाव बांधण्याचा चंग वृक्षमित्र आणि माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी बांधला आहे.
२०१७ पासुन बकोरी येथील सरकारी गायरान गट नंबर १६० केसनंद येथील वनजमीन गट नंबर ११२ वरती वृक्षारोपण ,जलसंधारण ही कामे चालू आहेत आज अखेर ५०,००० झाडे लावुन त्याचे नियमित संगोपण चालू आहे, पाणी आडवा पाणी जिरवा या धर्तीवर २००० पेक्षा जास्त समांतर चर घेण्यात आले आहेत, या डोंगरावर २५ लक्ष झाडे लावण्याचा मानस असल्याचे वारघडे यांनी सांगितले असून त्यांचे हयातीत १ कोटी झाडे लावणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले आहे तसेच परीसरात १०० कोटी लिटर साठवनूक तलाव करणार असल्याचा संकल्प वारघडे यांनी केला असून त्यापैकी यावर्षी बकोरी देवराई वनराई प्रकल्पात १ कोटी लिटर साठवन क्षमता असलेला तलाव करण्याचे काम चालू आहे. रात्र दिवस रखरखत्या भर उन्हामध्ये युद्ध पातळीवर काम सुरु असून वारघडे स्वतः ३५ डीग्री तापमाना मध्ये दिवसभर भर ऊन्हात थांबून काम करुन घेत आहेत, कामासाठी पैसे संपले परंतु वारघडे थांबले नाहीत त्यांनी घरातील सोने गहाण ठेऊन पैशाची व्यवस्था केली आहे. अशाप्रकारे खऱ्याअर्थाने समाजासाठी काम करणारा एखादाच चंद्रकांत वारघडेसारखा अवलिया असतो, त्याठीकानी तलावातील जो दगड मुरुम निघत आहे त्याचे माध्यमातून गायरान क्षेत्रातून ३ की.मि.रस्ता तयार केला असून यापुढील काळात वृक्षारोपण करणेसाठी तसेच शेतकऱ्यांना त्या रस्त्याचा फायदा होणार आहे सदर तलावाचे माध्यमातून पुढील शेकडो वर्षे पशुपक्ष्यांना पाणी,झाडांना पाणी,स्थानिक शेतकर्यांना पाणी अशाप्रकारे फायदा होणार असल्याचे वारघडे यांनी केले असून या कामासाठी दानशूर व्यक्तीनी मदत करण्याचे आवाहन वारघडे यांनी केले असून त्यांच्या या डोंगराएवढ्या कामाचे सर्व स्तरातून आश्चर्य व कौतुक करण्यात येत आहे