खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी इत्यादी गुन्हयातील व मोक्का गुन्हयामधील फरार आरोपीस लोणीकंद पोलीसांनी केले जेरबंद

खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी इत्यादी गुन्हयातील व मोक्का गुन्हयामधील फरार आरोपीस लोणीकंद पोलीसांनी केले जेरबंदखुन दरोडा जबरी चोरी घरफोडी इत्यादी सारख्या गंभीर गुन्हयामध्ये सहभागी असलेला आरोपी नामे गणेश रामभाऊ चव्हाण वय २१ वर्षे हा शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तलयातील पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या एका खुनाच्या गुन्हयातील पाहीजे असल्या बाबतची माहीती लोणीकंद पोलीस ठाणे येथे मिळाली होती. शिरगाव परंदवाडी मध्ये सदर आरोपीने त्याची भावजय नामे सुनंदा चव्हाण हीचा स्वःतचा भाऊ व तिचा पती लक्ष्मण चव्हाण याचे मदतीने तिचे डोक्यात दगड घालुन खुन केला व थंड डोक्याने ते प्रेत जवळ असणा-या पाचार्णे गावच्या डोगंरात नेवुन तिथे टिकावाचे सहाय्याने खड्डा खोदुन पुरुन टाकले त्यानंतर परत येवुन दारु व मटनाचे जेवण बनवुन पार्टी केली. अशा पध्दतीने प्रेताची विल्हेवाट लावली आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरचा आरोपी हा लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दी मध्ये अधुन मधुन येत असल्याने या पोलीस ठाणेचे तपास पथकाचे अंमलदार अजित फरांदे यांनी त्यांचे बातमीदारांना याबाबत जागृत राहण्याचे सुचित केले होते.आज रोजी सदरचा आरोपी हा लोणीकंद पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात येणार आहे अशी माहीती पोलीस नाईक अजित फरांदे यांना बातमीदारांकडुन प्राप्त झाली होती ती तात्काळ मावरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे सोा. यांना दिली त्यावरुन सपोनि रविंद्र गोडसे यांचे नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आले. पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार किरण पड्याळ, पोलीस नाईक अजित फरांदे, महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा पानसरे यांनी त्याचे सासरे लहु श्रीराम जाधव यांचेकडे येणार आहेअशा प्राप्त झालेल्या बातमीनुसार जिल्हा परीषद शाळा लोणीकंद च्या ज़वळ सापळा लावला. सदरचा आरोपी हा त्याठिकाणी येताच नमुद स्टाफने त्यास लागलीच झडप घालुन जेरबंद केले व त्यास लोणीकंद पोलीस स्टेशन येथे आणले सदर आरोपीला खुनाच्या गुन्हयातील पुढील तपास कामी शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशन कडील तपासी अधिकारी पोउपनि सचिन सुर्यवंशी व त्यांचे पथक यांचेकडे सुपूर्त करणेत आले आहे. त्यास उदईक रोजी मा.न्यायालयात रिमांड कामी हजर करुन रिमांड घेण्यात येणार आहे. सदर आरोपी विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे१) शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गुन्हा रजि.क्रं. १२/२०२४ भादवि ३०२,२०१२) चाकण पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा रजि. नं३४२/२०२२ भादवि ३७९३) लोणीकंद पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.क्रं.७७६/२०१९ भादवि ४६१,३८०४) बेलवंडी पोलीस ठाणे अहमदनगर येथे गुन्हा रजि.क्रं. १७७/२०१८ भादवि ३९५ ५) अहमदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.क्रं. ३८२/२०१९ भादवि ३९४,३४त्याचे विरुध्द चाकण पोलीस ठाणे कडील गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाप्रमाणे कलम वाढ करणेत आली असुन दाखल गुन्हयात तो पाहीजे आरोपी होता.सदरची कामगिरी मा. श्री. संजय पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे व मा. श्री. विश्वजीत काइंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार किरण पड्याळ, पोलीस नाईक अजित फरांदे, महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *