महावितरण ॲक्शन मोड मध्ये वीज चोरी थांबवा ; अन्यथा गुन्हा महावितरणचे वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीस पत्र

वाडेबोल्हाई ग्रामपंचायती कडून अनधिकृत वापरत असलेले पथदिवे दोन दिवसात बंद करावेत आणि रीतसर पहिले स्ट्रीट लाइट मीटर घ्यावे अन्यथा अनधिकृत वीज वापर चालू आढळल्यास ग्रामपंचायतीवर भा.वि. कायदा कलम १३५ अंतर्गत वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे पत्र महावितरण चे सहाय्यक अभियंता यांनी सरपंच/ ग्रामसेवक यांना काढले आहे.
दैनिक प्रभात ने वाडे बोल्हाई  ग्रामपंचायती कडून अनधिकृत पथदिवे सुरू करून गेल्या तीन महिन्यापासून केलेल्या वीज चोरी बाबतच्या प्रश्नाला वाचा फोडली होती.
ग्रामपचायत वाडेबोल्हाई ह‌द्दीत बऱ्याच ठिकाणी पोलवर परस्पर पथदिवे लावलेले  दिसत आहेत, त्यासाठी आपण स्ट्रीट लाइट मीटर घेणे आवश्यक आहे परंतु आपण तसे न करता अनधिकृत पणे स्ट्रीट लाइट वापरत आहे असे निदर्शनास आलेले आहे.  त्यामुळे वापरलेले वीजेचे मापन कुठेही होताना दिसत नाही त्यामुळे एकूणच महावितरण कंपनीने  आर्थिक नुकसान होत आहे. असे महावितरण कडून पात्रद्वारे ग्रामपंचायतीला कळवण्यात आले आहे. महावितरण कंपनी ॲक्शन मोड मध्ये आली असून वाडेबोल्हाई ग्रामपंचायतकडून अनधिकृतपणे पथदिवे सुरू असल्यास कारवाईचा इशारा महावितरण दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *