पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपदी मेघराज कटके यांची निवड

वाघोली तालुका हवेली कटकेवाडी चे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पैलवान मेघराज कटके यांची पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांचा निवडीबद्दल संघटनेच्या वतीने तसेच महाराष्ट्रातील कुस्तीगीर शौकिनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या हस्ते मेघराज कटके यांचा सत्कार करण्यात आला. वाघोली ग्रामस्थांच्या वतीने समाजसेवक संपत गाडे, दीपक वाकचौरे आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. गेल्या 40 वर्षात कुस्ती या क्रीडा प्रकारात जास्तीत जास्त चांगले खेळाडू घडवण्यासाठी कुस्ती क्षेत्रात अतुलनीय योगदान कटके यांनी दिले आहे. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीमध्ये आपली वेगळी प्रतिमा उंचावण्यात कटके यशस्वी झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदकाची कमाई करण्यासाठी मार्गदर्शन मदत करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मेघराज कटके यांनी सांगितले. गेल्या वीस वर्षापासून मेघराज कटके हे गोरगरीब खेळाडूंसाठी उत्तम मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे. वाघोली पंचक्रोशीतून कटके यांच्यावर निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *