वाघोली : पुणे-नगर रोडसह इतर रस्त्यांवर सकाळी सात ते दहा व सायंकाळी पाच ते नऊ यावेळेत सर्व प्रकारच्या जड, अवजड, मंदगती (डंपर, आर.एम.सी. मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर व इतर तत्सम वाहने) वाहनांची वाहतूक तसेच पार्किंग करण्यास बंदी करण्यात आली आहे. पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी तात्पुरत्या स्वरुपात प्रायोगीक तत्वावर हा आदेश काढला आहे. यावर पाच मार्च पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात वाहनांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. विविध मोठे प्रकल्प (मेट्रो, उड्डाणपूल, विविध विकासकामे) सुरु आहेत. तसेच अवजड वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना धोका निर्माण होवून गैरसोय होते. हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशातून अत्यावश्यक वाहने व पीएमपीएमएल, खाजगी बसेस वगळण्यात आली आहेत. याबाबत पाच मार्च पर्यंत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर अतींम आदेश काढण्यात येणार आहे.
वाघोली येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद असून नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. संपत गाडे मुख्य समन्वयक, वाहतूक नियंत्रण समिती